Wednesday, July 9, 2025

२०२०-२१ मध्ये रत्नागिरीत सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने

२०२०-२१ मध्ये रत्नागिरीत सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने

रत्नागिरी (वार्ताहर) : रत्नागिरी जिल्ह्यात वर्ष २०२०-२१ मध्ये ११ हजार ४१४ मृत्यू झाले. यामध्ये सर्वाधिक मृत्यू हृदयविकाराने झाले होते. तर एड्सने ३६ मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून देण्यात आली. १३० आत्महत्या झाल्या असून रहदारीतील अपघातामुळे १७६ लोकांचा मृत्यू झाला.



रत्नागिरी जिल्ह्यात मृत्यूची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनामुळे सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन केलेले असतानाच हृदविकाराच्या झटक्याने १५२४ पुरुषांचा आणि १२६९ महिलांचा मृत्यू झाला. तसेच क्षयरोग, निमोनिया, पक्षाघात, कर्करोग, आत्महत्या आदींमुळेही मृत्यू झाले असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एड्सने ३६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये २० पुरुषांचा समावेश आहे. रस्त्यावर होणाऱ्या अपघातामुळे १३४ पुरुषांचा व ४२ महिलांचा मृत्यू झाला आहे.



बाळंतपणात मातेचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून रत्नागिरी जिल्ह्यात बाळंतपणामुळे १२ महिलांचा मृत्यू झाला तर मूत्रपिंड खराब झाल्यामुळे ३५८ मृत्यू झाले. विविध कारणांमुळे ११ हजार ४१४ मृत्यू झाल्याची नोंद जिल्हा आरोग्य अिधकारी यांच्याकडून संबंधित विभागांना देण्यात आली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा