
अलीकडच्या काही वर्षांत निसर्गचक्रच बदलले असून कोणत्याही ऋतूत पाऊस पडू लागल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा तर डिसेंबरपर्यंत पाऊस लांबला. त्यामुळे थंडीचा हंगाम काहीसा पुढे गेला. त्याचा परिणाम आंबा आणि काजूच्या मोहोरावर काही अंशी झाला. मात्र आता जानेवारी सुरू होऊन आंबा काजू मोहोराला पोषक वातावरण असताना शुक्रवारी दिवस•भर मळ•भटीचे वातावरण आणि सायंकाळी सुमारे तासभर हलक्या पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे वातावरणात कमालीचा बदल झालेला अनु•भवायला मिळत आहे. सकाळी थंडीचा कडाका आणि दिवस•भर ढगाळ वातावरण त्यात पाऊस अशी काहीशी विचित्र नैसर्गिक परिस्थिती आहे. त्यातून साथीचे आजार बळावण्याचा धोका जाणकारातून व्यक्त करण्यात आला आहे. तर अवकाळी पावसामुळे आंबा, काजू मोहोरावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.