Tuesday, October 28, 2025
Happy Diwali

सरकारच्या अक्कलेचे दिवाळे निघाले आहेत-प्रवीण दरेकर

सरकारच्या अक्कलेचे दिवाळे निघाले आहेत-प्रवीण दरेकर

गोव्यात काँग्रेस शिवसेनेला विचारायला तयार नसल्याचे वक्तव्य विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केले आहे. अशातच संजय राऊत हे स्वबळाचा केविलवाणा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होत की बँक चालवायला अक्कल लागते. मात्र, नारायण राणे यांनी जिल्हा बँक निवडणूक जिंकली, याचा अर्थ अक्कल कुठे आहे हे दिसते, असे म्हणत दरेकर यांनी अजित पवार यांना टोला लगावलाय. सरकारच्या अक्कलेचे दिवाळे निघाले असल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. प्रश्न विचारायला नाही तर उत्तर द्यायला अक्कल लागते असेही दरेकर म्हणाले.

हे सरकार नेमकं कोणासाठी काम करते. हे सरकार बिल्डर, दारू विक्रेत्यांसाठी काम करते का? असा सवाल यावेळी दरेकर यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मोबदला कमी मिळावा यासाठी, भूसंपादन किंमत कमी केली जात आहे. यावरुन शेतकऱ्यांच्या विषयी सरकारच्या मनात काय आहे हे स्पष्ट होत असल्याचे यावेळी दरेकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अनेक सिनेकलाकार बोलत असतात त्यांना कोणी कामावरून काढले का? कोण हा किरण माने? असे दरेकर यावेळी म्हणाले. राजकारण करत इमोशनल स्टेटेजी पुढे केली जात आहे. यामध्ये भाजपचा काय संबंध अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी किरण माने प्रकरणावर दिली.

 

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा