
सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी चौदा हजार रुपयांची लाच स्वीकारताना १२ जानेवारीला भरणे मंडल अधिकारी सचिन यशवंत गोवळकर यांना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने भरणे ग्रामपंचायत कार्यालयात अटक केली होती.
खरेदी केलेल्या जमिनीच्या ७/१२ वर नावाची नोंद घालून ती मंजूर करून देण्यासाठी सचिन गोवळकर यांनी एका व्यक्तीकडे १५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत संबंधित व्यक्तीने रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार, ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले व अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीच्या पथकाने १४ हजार रुपये लाच रक्कम ग्रामपंचायत भरणे या इमारतीमधील मंडल अधिकारी कार्यालय येथे स्वीकारताना सचिन गोवळकर यांना रंगेहाथ पकडले होते.