Friday, December 26, 2025

राजकुमारच्या नावाने बनावट मेल

राजकुमारच्या नावाने बनावट मेल

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव यांच्या नावाने चोरांनी बनावट ईमेल आयडी तयार करून लोकांकडून तीन कोटी रुपये उकळण्याचा कट रचला. अभिनेत्याने बनावट ईमेलची एक प्रत शेअर केली आहे, ज्यामध्ये अभिनेत्याच्या नावावर चित्रपटाच्या करारासाठी तीन कोटी 10 लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. जेव्हा राजकुमार रावला या फसवणुकीची वेळीच कल्पना आली तेव्हा त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

राजकुमार रावने पोस्टमध्ये लिहिले की, ''बनावट, कृपया अशा लोकांपासून सावध रहा. सौम्या नावाच्या व्यक्तीला मी ओळखत नाही. हे लोक बनावट ईमेल आयडी आणि व्यवस्थापक वापरून लोकांना मूर्ख बनवत आहेत.''

Comments
Add Comment