Tuesday, July 1, 2025

बसपाकडून 53 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपानं पहिल्या टप्प्यातील 58 पैकी 53 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केलीय. त्यावेळी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. "इतर पक्ष युती करून बसपाला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, मला खात्री आहे की जनता आम्हालाच पुन्हा सत्तेत आणेल. यावेळीही सत्तेत आल्यानंतर आम्ही जनतेच्या हितासाठीच काम करू", असं पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी म्हटलंय.


मायवती यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लखनऊमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची नावे जाहीर केली. "आम्ही विधानसभेच्या 58 जागांपैकी 53 जागांवर आमच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत आणि उर्वरित 5 जागांवरही एक-दोन दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित केली जातील", असं त्यांनी म्हटलंय.


Comments
Add Comment