Thursday, October 10, 2024
Homeताज्या घडामोडी'आश्रय' चित्रपटाचं पोस्टर लाँच

‘आश्रय’ चित्रपटाचं पोस्टर लाँच

मुंबई : सामाजिक जाणिवेचं भान राखून बनवण्यात येणारे काही चित्रपट नेहमीच प्रेक्षकांसोबतच समीक्षकांच्याही मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतात. असे चित्रपट मग देश-विदेशातील सिनेमहोत्सवांमध्येही बाजी मारत मराठीचा नावलौकीक वाढवण्याचं काम करतात. अशाच चित्रपटांचा वारसा सांगणारा ”आश्रय” हा एक नवा कोरा मराठी चित्रपट लवकरच रसिक दरबारी हजर होणार आहे. ”आश्रय”चं कुतूहल जागवणारं पहिलं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं असून, सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रियांसह कौतुकास पात्र ठरत आहे.

संकल्प मोशन फिल्म्स प्रस्तुत आणि अभिषेक संजय फडे निर्मित ”आश्रय” या चित्रपटाचं लक्ष वेधून घेणारं पोस्टर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.ना विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील, मा. जयसिंह शंकरराव मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार मा. रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, चेअरमन शिवामृत दूध उत्पादक संघ शंकरनगर अकलूज, सोलापूर व भाजपचे जिल्हा सरचिटणीस मा. धैर्यशील राजसिंह मोहिते पाटील व पंचायत समिती सदस्य मा. अर्जुन सिंह मदनसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते लाँच करण्यात आलं आहे. या सोहळ्याला निर्माते, दिग्दर्शक, कलाकार व तंत्रज्ञही हजर होते. या चित्रपटाच्या माध्यमातून निर्माते आणि लेखक-दिग्दर्शकांनी समाजातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. जागतिक पातळीवरील विविध महोत्सवांसोबतच मराठी तिकिटबारीही या चित्रपटाचा भरघोस व्यवसाय होवो अशा शुभेच्छा यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी दिल्या.

रमेश पोपट ननावरे आणि संतोष साहेबराव कापसे या दिग्दर्शकांनी ”आश्रय”चं दिग्दर्शन केलं आहे. ”आश्रय”मध्ये प्रेक्षकांना एका अनाथ लहान जीवाची कथा पहायला मिळेल. स्वबळावर, स्वकर्तृत्वार, स्वमेहनतीनं पुढं जाण्याची उर्मी असणाऱ्या तरुणाईला प्रेरणादायी ठरावी अशी गोष्ट या चित्रपटात आहे. यात निशिगंधा वाड, श्वेता पगार, अमेय बर्वे, सुनील गोडबोले, दीपाली कुलकर्णी आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा अभिषेक संजय फडे यांनी लिहीली असून, पटकथा-संवाद दीक्षित सरवदे यांनी लिहीले आहेत. डिओपी राजू देशमुख आणि प्रथमेश शिर्के यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन प्रदीप पांचाळ यांचं आहे. विशाल बुरुडकर यांनी संगीत दिग्दर्शन केलं असून, पार्श्वसंगीताची जबाबदारी अनिकेत जैन यांनी सांभाळली आहे. आरती अभिषेक फडे यांनी लिहिलेल्या गीतरचना आनंद शिंदे, ऋषिकेष रानडे या आघाडीच्या गायकांसोबत स्वत: आरती यांनीही गायल्या आहेत. व्हीएफक्स आणि डीआयची बाजू जयेश मलकापुरे यांनी सांभाळली असून प्रोडक्शन कंट्रोलर आहेत विनायक ढेरेंगे. अमृता सावंत पाटील यांनी वेशभूषा केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -