Friday, June 13, 2025

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे बिनविरोध

पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे बिनविरोध
पुणे:  पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडिसीसी) अध्यक्षपदी प्रा. दिगंबर दुर्गाडे (पुरंदर) तर उपाध्यक्षपदी सुनील चांदेरे (मुळशी) यांची एकमताने निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिका-यांची निवड करीत जिल्ह्यातील भविष्यातील निवडणुकांचा विचार करून यानिमित्ताने समतोल साधल्याचे बोलले जात आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण) मिलिंद सोबले यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची पहिली बैठक बँकेच्या सभागृहात शनिवारी दुपारी एक वाजता झाली. त्यामध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दुर्गाडे आणि चांदेरे यांचा एकमेव अर्ज आला, त्यामुळे पदाधिका-यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.
Comments
Add Comment