ठाणे (वार्ताहर) : कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाच्या श्रेयावरून सेना-राष्ट्रवादीत बाचाबाची झाली. कळव्यातील खारेगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात शनिवारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी सेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली.
यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. मात्र, काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. आपण सगळे एकच आहोत, असे सांगत दोन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र, या घटनेमुळे स्थानिक पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले.
खारेगाव उड्डाणपुलासाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केल्याचा दावा शिवसैनिकांनी केला.
कार्यक्रमस्थळी शिवसेनेचे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लागले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याठिकाणी येत बॅनर्स आणि झेंडे लावायला सुरुवात केली. दरम्यान यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये वादाची ठिणगी पडली. शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक उमेश पाटील घटनास्थळी आले. तेव्हा शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, काहीवेळातच परिस्थिती नियंत्रणात आली.
खारेगाव उड्डाणपुलाचे काम बराच काळ रखडले होते. मफतलाल कंपनीची जमीन मिळत नसल्यामुळे उड्डाणपुलाचे काम सातत्याने लांबणीवर पडत होते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…
मुंबई : केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र वेतन संहिता नियम, २०२५ आणि…
Rafrigerator Care: सध्या उन्हाळा प्रचंड वाढला असून,या काळात एसी , कूलर पाठोपाठ थंडगार पाणी तसेच…
मुंबई: उन्हाळ्यात आपले शरीर थंड ठेवणे अतिशय गरजेचे असते.कारण या मोसमात अॅसिडिटी, डायरिया तसेच पचनासंबंधित…
कोल्हापूर : राज्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. एसटी बस, ट्रक यांचे अपघात सर्रास पाहायला…
मेरठ: शुभांगी अत्रे यांच्या माजी पतीच्या निधनानंतर, टीव्ही इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर येत…