Tuesday, July 16, 2024
Homeमहत्वाची बातमीमहावितरणच्या वागळे इस्टेट उपविभागाने पकडली ३७ लाखांची वीजचोरी

महावितरणच्या वागळे इस्टेट उपविभागाने पकडली ३७ लाखांची वीजचोरी

मुंबई (प्रतिनिधी) : सध्या महावितरणच्या सर्व परिमंडलात वीज बिलाच्या थकबाकीची वसुली तसेच वीजचोरी विरुद्ध धडक मोहीम सुरु आहे. अशा एक तपासणीमध्ये महावितरणच्या भांडूप परिमंडलातील वागळे इस्टेट उपविभागाने नुकतीच ३७,२९,५०० रुपयांची वीजचोरी पकडली आहे. यापुढेही ही मोहीम अजून तीव्र होणार आहे असा इशारा भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिला.

या वीजचोरीबाबत कंपनीचे मालक दिनेश कटीयाल यांच्याविरुद्ध कोपरी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ०५ जानेवारी २०२२ रोजी वागळे इस्टेट उपविभागातील सहाय्यक अभियंता विजय पाटील आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे वीज मीटरची तपासणीसाठी गेले होते. वागळे इस्टेट येथील मेसर्स श्रीराम इंडस्टरीस येथे गेले असता हा वीजग्राहक बेकायदेशीर वीज वापर करीत असल्याचा संशय सहाय्यक अभियंता पाटील यांना आला. त्यांच्या वीजमीटरची तपासणी केली असता वीजमीटरचे सील उघड्या अवस्थेत आढळून आले.

दि. ०६ जानेवरी रोजी या वीज मीटरचा घेण्यात आलेला एम.आर.आय. अहवाल व ग्राहक असलेल्याच्या रोहीत्रावरील दुसऱ्या ग्राहक याचा मागील सहा महिन्यांच्या अहवालाची तपासणी केली असता हा ग्राहक जामर वापरून वीज चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले. जामरच्या मदतीने वीज वापराची नोंद होत नाही अथवा कमी होते. या प्रकारे, दिनेश कटीयाल यांनी महावितरण कंपनीची मागील सहा महिन्यांत अंदाजे एकूण ३७,२९,५०० रुपयांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -