Saturday, July 20, 2024
Homeदेशईपीएफओ खात्यातून एक लाखांपर्यंत रक्कम काढता येणार

ईपीएफओ खात्यातून एक लाखांपर्यंत रक्कम काढता येणार

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या खात्यातून आता एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. मेडिकल क्लेम अंतर्गत कर्मचाऱ्यांना हे पैसे काढता येणार असून यासाठीच्या नियमात लवकरच बदल करण्यात येणार आहे. ईपीएफओने जारी केलेल्या निवेदनानुसार, आता ईपीएफओ सदस्य कोणतीही कागदपत्रे सादर न करता त्यांच्या पीएफ खात्यातून एक लाख रुपये काढू शकणार आहेत.

ईपीएफओने ही सुविधा पगारदारांना मेडिकल ऍडव्हान्स क्लेम अंतर्गत दिली आहे. जर खातेधारकांना वैद्यकीय कारणांसाठी तातडीने पैशांची गरज असेल, तर ते त्यांच्या खात्यातून एक लाख रुपये काढू शकतात, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे. सेवानिवृत्तीवेळी कर्मचाऱ्यांना व्याजासकट रक्कम दिली जाते. सोबत कर्मचाऱ्यांना पेंशन योजनेतदेखील गुंतवणूक करण्याचा पर्याय असतो. त्याशिवाय पीएफची रक्कम काही कारणास्तव मुदतीआधी देखील काढता येते. मात्र, यासाठी मर्यादा घालण्यात आलेल्या असतात. दरम्यान, नियमांमध्ये करण्यात येणाऱ्या बदलामनुसार ईपीएफओ खातेधारक त्याच्या खात्यातून एक लाखांपर्यंतची रक्कम काढू शकणार आहे. मेडिकल क्लेम अंतर्गत ही एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम खाते धारकाला काढता येणार आहे. विशेष म्हणजे ही रक्कम घेताना खातेधारकाला कोणत्याही कागदपत्रांशिवाय ही रक्कम मिळू शकते.

वैद्यकीय अडव्हान्सचा दावा करणारा रूग्णाला सरकारी/सार्वजनिक क्षेत्रातील युनिट/सीजीएचएस पॅनेल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे. तातडीच्या स्थितीत खासगी रुग्णालयात दाखल केले असेल, तर यासंदर्भात चौकशी केली जाईल. त्यानंतरच, तुम्ही वैद्यकीय दाव्यासाठी अर्ज भरू शकता. या सुविधेअंतर्गत तुम्ही फक्त एक लाख रुपयांपर्यंतच अॅडव्हान्स काढू शकता. तुम्ही कामाच्या दिवशी अर्ज करत असाल तर दुसऱ्याच दिवशी तुमचे पैसे खात्यात ट्रान्सफर केले जातील. हे पैसे कर्मचा-यांच्या खात्यात किंवा थेट हॉस्पिटलमध्ये हस्तांतरित केले जाऊ शकतात.

ईपीएफओच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ‘ऑनलाइन सेवा’ पर्यायावर क्लिक करावे त्यानंतर फॉर्म 31, 19, 10C आणि 10D भरावे लागतील. पडताळणी करण्यासाठी कर्मचाऱ्याच्या बँक खात्याचे शेवटचे चार अंक एंटर करा ‘ऑनलाइन दाव्यासाठी पुढे जा’ वर क्लिक करावे. ड्रॉप-डाउन मेनूमधून फॉर्म 31 निवडावा त्यानंतर आता पैसे काढण्याचे कारण आणि रक्कम प्रविष्ट करावी. रुग्णालयाच्या बिलाची प्रत अपलोड करा आणि आपला पत्ता प्रविष्ट करा आणि ‘सबमिट’ वर क्लिक करावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -