Saturday, October 18, 2025
Happy Diwali

भव्य पतंग साकारत दिला कोरोना गो बॅकचा संदेश

भव्य पतंग साकारत दिला कोरोना गो बॅकचा संदेश

कल्याण  : कल्याण पश्चिमेतील नूतन विद्यालयात भव्य पतंग साकारत कोरोना गो बॅकचा संदेश दिला. १९२७ मध्ये सायमन कमिशन गो बॅक स्वातंत्र्य सेनानींनी आकाशात पतंग उडवून घोषणा दिल्या होत्या. तेव्हापासून आजतागायत पतंग उडविण्याची प्रथा सुरू झाली.

कल्याणमधील नूतन विद्यालयाचे कलाशिक्षक श्रीहरी पवळे आणि विद्यार्थ्यांनी १२ फूट बाय १८फूट आकाराचा कल्याणमधील सर्वात मोठा पतंग तयार करून शाळेच्या इमारतीवर लावला आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक ही कलाकृती पाहून कौतुक करीत आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद आणि संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी कला शिक्षक श्रीहरी पवळे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Comments
Add Comment