Sunday, August 31, 2025

कल्याण येथील लखोबा जेरबंद

कल्याण येथील लखोबा जेरबंद
कल्याण : कल्याण येथे राहणाऱ्या एका एलआयसी एजंट साईनाथ ऊर्फ प्रकाश देसले ने पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर फारकत सुरू असताना एका अविवाहित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखवून आत्महत्त्या करण्याची धमकी देऊन तरुणीसोबत विवाहाच्या बंधनात अडकलेल्या लखोबाला अखेर कल्याण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तरुणीने स्वत: पुढाकार घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लेखी तक्रार अर्ज करून दाद मागितली. त्याआधारे पोलिसांनी देसले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या पीडितांनी मर्जी संघटनेशी संपर्क साधण्याचे आवाहन संघटनेच्या सल्लागार अॅड . तृप्ती पाटील यांनी केले आहे.
Comments
Add Comment