नवी दिल्ली : काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी गुरुवारी जाहीर केली. त्यात ५० महिलांचा समावेश असून उन्नावमधील सामुहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेची माता आणि गोंड जमातीच्या उंभा गावातील जमिनीसाठी लढा देणारे रामराज गोंड यांचा त्यात समावेश आहे. या यादीत ‘बिकिनी गर्ल’ अर्चना गौतम हिचे देखील नाव आहे.
काँग्रेसकडून २६ वर्षीय माजी मिस बिकनी इंडिया अर्चना गौतमने राजकीय मैदानात प्रवेश केला आहे. अर्चनाची जादू आता राजकीय पटलावर चालते का? हे लवकरच पहायला मिळणार आहे.
अर्चना गौतमने अभिनेता विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानी यांच्यासोबत ग्रेट ग्रँड मस्ती चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
त्यानंतर ती श्रद्धा कपूरच्या हसिना पारकर आणि बारात कंपनी या चित्रपटात देखील दिसली होती. जंक्शन वाराणसी चित्रपटामध्ये अर्चनाने एक आयटम नंबर केला होता. तिने टी-सीरिजच्या म्युझिक व्हिडीओंमध्येही काम केले आहे.