Saturday, June 21, 2025

देशात २४ तासात २,६४,२०२ नवे कोरोना रुग्ण; ३१५ जणांचा मृत्यू

देशात २४ तासात २,६४,२०२ नवे कोरोना रुग्ण; ३१५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : भारतात सलग दुसऱ्यादिवशी कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. कालच्या तुलनेत आज ६.७ टक्के रुग्ण वाढले आहेत. देशात गेल्या २४ तासात २ लाख ६४ हजार २०२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात १ लाख ९ हजार ३४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या १२ लाख ७२ हजार ७३ इतकी झाली आहे.


https://twitter.com/ANI/status/1481833216080478209?ref_src

दिवसेंदिवस दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेटही वाढत असून ही चिंतेची बाब आहे. आज दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १४.७८ टक्क्यांवर पोहोचला आहे. काल तो ११ टक्क्यांवर होता. दुसऱ्या बाजुला ओमायक्रॉन रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आतापर्यंत देशात ५ हजार ७५३ जणांना कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉनची लागण झाली आहे.


भारतात दिवसभरात कोरोनामुळे ३१५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात एकूण ४ लाख ८५ हजार ३५० जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

Comments
Add Comment