Friday, October 17, 2025
Happy Diwali

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन
नाशिक : जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दहा ते पंधरा एस. टी. कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, संपकरी एस. टी. कर्मचारी सुप्रिया काकड, जनार्दन जगताप, संजय मोहिते, सुनील राठोड, एम. जे. जाधव, तानाजी जाधव, भीमराव शिंदे व इतर १० ते १५ कर्मचारी यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्याकडून करण्यात आलेल्या कारवाईतून न्यायालायाने त्यांना हमीपत्र घेऊन मुक्त केले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी घोषणा देऊन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना एकत्रित येऊन आनंदोत्सव साजरा केला म्हणून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
Comments
Add Comment