Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

कल्याणमध्ये अनधिकृत शेड, टपऱ्यांवर तोडक कारवाई

कल्याणमध्ये अनधिकृत शेड, टपऱ्यांवर तोडक कारवाई

कल्याण (वार्ताहर) : "क" प्रभाग क्षेत्रातील अनाधिकृत शेड, टपऱ्यांवर तसेच अनधिकृत बांधकामांवर "क" प्रभागक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त सुधीर मोकल यांच्या पथकाने गुरुवारी तोडक कारवाई केली.



मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्दशानुसार अनाधिकृत बांधकामे, टपऱ्या, शेडवर तोडक कारवाई मोहीम व्यापकपणे सुरू असून "क" प्रभागक्षेत्रातील आंबेडकर रोड अंसारी चौक येथील खालीद अब्दुल कादिर यांच्या अनधिकृत फुटिंगच्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली.



तसेच वल्लीपीर चौक ते भोईवाडा रोडवरील गॅरेजसमोरील अनधिकृत २८ शेडवर तोडक कारवाई करण्यात आली. अनाधिकृत २ टपऱ्यावर निष्कासित कारवाईचा बडगा उचलण्यात आला. तोडक कारवाईसाठी कल्याण डोंबिलली मनपा पोलीस, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व एक जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या अनधिकृत टपऱ्या, शेडवर तोडक कारवाईमुळे अनधिकृत टपऱ्या, शेड उभारणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Comments
Add Comment