Friday, May 9, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

यंदाचा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द

पुणे: राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या यापार्श्वभूमीवर २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान होणारा ६८वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे.

यावर स्पष्टीकरण देताना जोशी म्हणाले, राज्यात व शहरात वाढत असलेली कोरोना बाधितांची संख्या आणि राज्य सरकार व स्थानिक प्रशासन यांच्याकडून परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत आहेत. यामुळं निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत आहे.
Comments
Add Comment