Tuesday, April 29, 2025

विदेशताज्या घडामोडी

सोमालियात आत्मघातकी हल्लेखोराकडून स्फोट, १० जणांचा मृत्यू

सोमालियात आत्मघातकी हल्लेखोराकडून स्फोट, १० जणांचा मृत्यू

मोगादिशु : सोमालियाची राजधानी असलेल्या मोगादिशुमध्ये एका आत्मघातकी हल्लेखोराकडून आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर स्फोट करण्यात आला. या घटनेत १० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये सैनिकांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल- शहबाब या दहशतवादी गटाने स्वीकारली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटावेळी मोगादिशुचे उपमहापौर अली अब्दी वारधेरे यांचा ताफा तेथील परिसरातून जात होता. सुदैवाने ते या हल्ल्यातून सुखरुप बचावले. या हल्ल्यात श्वेतवर्णीय अधिका-यांना लक्ष्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास सोमालिया पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment