Tuesday, July 1, 2025

नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश

नवी मुंबईतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीत यश
नवी मुंबई : राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने मागील वर्षी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरखैरणे येथील ज्ञान विकास संस्थेच्या प्राथमिक विद्यालयातील पाच विद्यार्थी ठाणे जिल्हास्तरावर चमकले.

या पाचही विद्यार्थ्यांना व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना संस्थेच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
या परीक्षेत ठाणे जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते. यामध्ये ठाणे जिल्ह्यातून अविष्का घरत, ओमकार काळे, सत्यवान धापते, साईराज बैलकर, शिवराज पाटील यांनी घवघवीत यश संपादन केले.

यावेळी मार्गदर्शक दळवी, पडळकर, ईशा सावंत, अलका चव्हाण, मुख्याध्यापिका सुमित्रा पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Add Comment