Tuesday, July 23, 2024
Homeक्रीडाआयपीएल आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेचा पर्याय?

आयपीएल आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेचा पर्याय?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयपीएल आयोजनासाठी दक्षिण आफ्रिका किंवा श्रीलंकेचा पर्याय ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या आजारामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करावी लागली. यावेळी आम्हाला ही स्पर्धा आखाती देशातून बाहेर काढायची आहे. केवळ एका देशावर अवलंबून राहू शकत नाही. आम्ही आणखी पर्याय शोधण्याचा निर्णय घेतला आहे, असे बीसीसीआयच्या माहितगारांनी सांगितले.

भारताचा टाइम झोन दक्षिण आफ्रिकेपेक्षा साडेतीन तास पुढे आहे. यूएई किंवा भारताप्रमाणेच, आयपीएलमधील रात्रीचे सामने लवकर सुरू करावे लागतात. जर प्रसारकांनी संध्याकाळी साडेसातच्या त्यांच्या पसंतीच्या वेळेला चिकटून राहिल्यास, दक्षिण आफ्रिकेत सामन्याचा पहिला चेंडू ४ वाजता टाकला जाईल. गेल्या काही वर्षांत, खेळाडूंनी अनेकदा मध्यरात्रीनंतर सामने संपत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

आयपीएल २०२२ म्हणजेच १५वा हंगाम अनेक अर्थांनी खास असणार आहे. संघांची संख्या ८ वरून १० झाली आहे. यावेळी मेगा लिलाव होणार असल्याने अनेक खेळाडू नव्या संघासोबत खेळताना दिसणार आहेत. करोनामुळे देशातील परिस्थिती बिघडली आणि आयपीएल परदेशात हलवणे हाच एकमेव पर्याय वाटत असेल, तर भारतीय बोर्ड दक्षिण आफ्रिकेला पहिली पसंती देईल, या देशात २००९ मधील आयपीएल स्पर्धा खेळली गेली होती.

सध्या भारतात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत आहे. मुंबई, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये परिस्थिती गंभीर होत आहे. देशांतर्गत क्रिकेटच्या अनेक स्पर्धा बीसीसीआयने एकापाठोपाठ एक पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे आयपीएलच्या आयोजनाबाबत साशंकता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -