मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबै बँकेच्या अटीतटीच्या लढतीत सत्ताधारी महाविकास आघाडीने एका मतदाराला आपल्या बाजूने खेचल्यामुळे गुरूवारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची निवड झाली. त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रसाद लाड यांचा ११ विरूद्ध ९ असा निसटता पराभव केला.
या निवडणुकीत भाजप तसेच सत्ताधारी आघाडीतले राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्याकडे प्रत्येकी १०-१० मते होती. परंतु गेल्या दोन दिवसांपासून भाजपचे विष्णू भुंबरे कोणाच्याच संपर्कात नव्हते. तेव्हाच ते भाजपतून फुटले असल्याचा कयास बांधला जात होता. अपेक्षेप्रमाणेच त्यांनी आज राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मतदान केल्याचे समजते आणि कांबळे यांनी बाजी मारली.
अध्यक्षपदावर महाविकास आघाडीने बाजी मारली असली तरी उपाध्यक्षपद भाजपने जिंकले आहे. उपाध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे अभिषेक घोसाळकर आणि भाजपचे विठ्ठल भोसले यांच्यात थेट लढत झाली. यामध्ये दोन्ही उमेदवारांना समसमान म्हणजे १०-१० मते मिळाल्याने चिठ्ठी टाकून उपाध्यक्षपद निवडण्याचे ठरले. यामध्ये भाजपच्या विठ्ठल भोसले यांनी बाजी मारली.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…