नवी दिल्ली : इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला असून भारताचा बॅटमिंटनपटू किदम्बी श्रीकांतसह अन्य ७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
किदम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, रितिका ठाकेर, ट्रिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन सिंघी आणि खुशी गुप्ता, या सात जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आता हे सर्व खेळाडू स्पर्धेतून बाहेर झाल्याची माहिती मिळतेय.
या खेळाडूंसोबत ज्या खेळाडूचा सामना होता त्यांना पुढील फेरीत वॉकओव्हर मिळणार आहे. याशिवाय त्यांना स्पर्धेच्या थेट दुसऱ्या फेरीत प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती बॅडमिंटन वर्ल्डने त्यांच्या एका निवेदनाद्वारे दिली आहे.