कुडूस/वाडा (वार्ताहर) : तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायतीच्या हद्दीत मेट फॉर्म ही कंपनी असून या कंपनीत लोखंडाचे उत्पादन केले जाते. गेल्या २० वर्षांपासून या कंपनीत काम करत असलेल्या कामगारांना कामगार कायद्याप्रमाणे किमान वेतन व इतर सोयी सुविधा मिळत नव्हत्या. अखेर केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे व महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्याने कंपनीत बैठका घेऊन कामगार, कंपनी मालक व कंपनी व्यवस्थापक यांच्यासोबत चर्चा करून कामगारांना पगारवाढ मिळवून दिली आहे.
तालुक्यातील चिंचघर ग्रामपंचायत हद्दीतील मेट फॉर्म कंपनीतील १७ कामगारांना महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेच्या माध्यमातून पगारवाढ मिळाली असून या कामगार संघटनेच्या प्रयत्नांना यश आले आहे.
पगारवाढीच्या झालेल्या बैठकीस कामगार संघटनेचे सेक्रेटरी विश्वनाथ दळवी, उपाध्यक्ष जितेश (बंटी) पाटील, कंपनीचे मालक देवांक ठक्कर, व्यवस्थापक मधुकर रसाळ, स्वाभिमान संघटनेचे तालुकाध्यक्ष रविंद्र मेणे आदि उपस्थित होते.
येथील कामगारांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, समर्थ कामगार संघटनेचे सेक्रेटरी विश्वनाथ दळवी व संघटनेचे उपाध्यक्ष जितेश पाटील तसेच स्वाभिमान संटनेचे तालुका अध्यक्ष रवींद्र मेणे यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला.