Thursday, July 25, 2024
Homeक्रीडाऋषभ पंतचं धडाकेबाज शतक

ऋषभ पंतचं धडाकेबाज शतक

भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर २१२ धावांचे विजयी लक्ष्य

केपटाऊन (वृत्तसंस्था): यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंतला (नाबाद १००) मोक्याच्या क्षणी सूर गवसला. त्याच्या ‘मास्टर स्ट्रोक’च्या जोरावर भारताने दुसऱ्या डावात १९८ धावांची मजल मारताना तिसरी आणि अंतिम कसोटी जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसमोर २१३ धावांचे लक्ष्य ठेवले.

पंतने चौथे कसोटी शतक झळकावताना भारताला दोनशेच्या घरात नेले. त्याच्या १३९ धावांच्या खेळीत ६ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. पंतने कोहलीसह पाचव्या विकेटसाठी ५१ धावा जोडताना डाव सावरण्याचा प्रयत्न केला. भारताच्या डावातील ही दुसरी भागीदारी ठरली. कोहलीने चेतेश्वर पुजारासह तिसऱ्या विकेटसाठी केलेली ६२ धावांची पार्टनरशीप डावातील सर्वाधिक ठरली.

२ बाद ५७ धावांवरून पुढे खेळताना तिसऱ्या दिवशी गुरुवारी पाहुण्यांनी उर्वरित ८ विकेटच्या बदल्यात १४१ धावांची भर घातली. त्यातील १०० धावा पंतच्या आहेत. कर्णधार कोहलीने त्याच्यानंतर सर्वाधिक धावा केल्यात. त्याने संयमी खेळ करताना १४३ चेंडूंत २९ धावा काढल्या. पंत आणि विराटच्या मिळून १२९ धावा पाहता भारताच्या उर्वरित आठ फलंदाजांनी केवळ ४१ धावांची भर घातली आहे. त्यात २८ धावा अंवातर रूपातील आहेत.

पंतने लाज राखली तरी मयांक अगरवाल (७ धावा), वनडाऊन चेतेश्वर पुजारा(९ धावा), अजिंक्य रहाणे (१ धाव) या भरवशाच्या फलंदाजांना केवळ खाते उघडता आले. उपकर्णधार लोकेश राहुलने १० धावा केल्या. कर्णधार कोहलीनंतर त्याच्या धावा सर्वाधिक आहेत. मात्र, भारताला दोनशेच्या घरात पोहोचवण्यात अवांतर धावांचा मोठा वाटा आहे. दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सनी अचूक मारा केला तरी २८ एक्स्ट्रॉ धावा दिल्या. त्यात ९ नोबॉल, २ वाइड, ९ लेगबाइज आणि ८ बाइज धावांचा समावेश आहे. यजमानांकडून मार्को जॅन्सेन सर्वात यशस्वी ठरला. त्याने ३६ धावा देत ४ विकेट घेतल्या. त्याला कॅगिसो रबाडा आणि लुन्गी एन्गिडीची (प्रत्येकी ३ विकेट) चांगली साथ लाभली.

अनेक विक्रमांना गवसणी

ऋषभने नाबाद शतकी खेळी करताना अनेक विक्रम नोंदवले. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका येथे कसोटीत ५० हून धावा करणारा तो भारताचा तिसरा यष्टिरक्षक-फलंदाज ठरला. किरण मोरे आणि महेंद्रसिंग धोनी यांनाच हा विक्रम करता आला आहे.
परदेशातील कसोटीतील ५० हून धावा करण्याची त्याची ही सहावी वेळ आहे. सय्यद किरमानी ( ५) यांचा विक्रम मोडला.यात धोनी ( १९), फारूख इंजिनियर ( ८) व किरण मोरे ( ८) हे आता आघाडीवर आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -