मुंबई (प्रतिनिधी) :भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्याअटकपूर्व जामिन याचिकेवर गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. या प्रकरणी आता सोमवारी १७ जानेवारी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत न्यायालयाने नितेश राणे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यास मनाई केली आहे. याआधी नितेश राणे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र, हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर नितेश राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.राज्य सरकारने नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर सुनावणी होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार नसल्याची हमी उच्च न्यायालयात दिली होती.
अखेर १८ दिवसांनी नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत दाखल
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आणि आमदार नितेश राणे अखेर १८ दिवसांनी माध्यमांसमोर आले आहेत. कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिल्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील नूतन अध्यक्षांची भेट घेत अभिनंदन केले. यावेळी त्यांना भेटण्यासाठी समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.