
मुंबई : वाचनसंस्कृतीचा वारसा जपण्यासाठी 'वाचू आनंदे' या उपक्रमांतर्गत डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट आयोजित बालसाहित्यिका माजी विश्वकोश अध्यक्षा डॉ. विजया वाड यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय १०० कवी, लेखक आणि ११ प्रकाशकांची फौज घेऊन बालसाहित्याची १६ पानी पुस्तकांचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
१८ जानेवारी २०२२ रोजी दुपारी ३:३० वाजता ऑनलाईन पद्धतीने हा प्रकाशन सोहळा पार पडेल.