‘दि.बां.चे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही’

पनवेल : दि.बा. सर्वांचे बाप होते, त्यांनी सर्व महाराष्ट्रासाठी संघर्ष केला आहे, त्यामुळे दि.बां.चे नाव लागल्याशिवाय विमान उडणार नाही, अशा शब्दात नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्याची आग्रही मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी कोल्ही कोपर येथे नवी मुंबई विमानतळ क्षेत्रात झालेल्या भूमिपुत्र निर्धार परिषदेत केली. तसेच ठाकरे सरकारला भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवता येत नसतील तर त्यांनी सत्ता सोडावी, अशा शब्दात घणाघाती टीका त्यांनी राज्य सरकारवर केली.

लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून दि.बा. यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरूवारी भूमिपुत्रांची 'भूमिपुत्र परिषद' आयोजित करण्यात आली होती. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गणपत गायकवाड, आमदार महेश बालदी, माजी आमदार सुभाष भोईर, कॉम्रेड भूषण पाटील, भारतीताई पवार, माजी उपमहापौर जगदिश गायकवाड, नंदराज मुंगाजी, संतोष केणे, गुलाब वझे, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, दशरथ भगत, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, राजाराम पाटील, जे. डी. तांडेल, राजेश गायकर, दीपक म्हात्रे, सुनिल म्हात्रे, रुपेश धुमाळ, सदानंद वास्कर, कांचन घरत, सुनील पाटील, प्रशांत पाटील, गोवर्धन डाऊर, के. के. म्हात्रे, सीमा घरत यांच्यासह रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पालघर, कल्याण, डोंबिवली आदी विभागातील समस्त हजारो भूमिपुत्र उपस्थित होते. तत्पूर्वी दिबांच्या पनवेल येथील संग्राम निवासस्थानी, तसेच जासई येथे तसेच गावोगावी दिबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
Comments
Add Comment

नगर पथ विक्रेता समिती' निवडणुकीच्या मतमोजणी सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नगर पथविक्रेत्यांची (फेरीवाला) मुख्य समिती आणि सात परिमंडळीय समिती निवडणुकीची

उद्योगवाढीसाठी राज्यात परवाने प्रक्रिया झाली सुलभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ३३ पैकी २० परवानग्या स्व-प्रमाणनावर आणण्यात यश मुंबई : महाराष्ट्रात उद्योग

नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन; दिल्ली-एनसीआरला मिळाले दुसरे आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वार

नवी दिल्ली : देशाच्या विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील जेवर

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तिपत्र  मुंबई : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

मुंबईत ३४० झाडांचा गुदमरलेला श्वास झाला मोकळा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेकडून सन २०२५ मध्ये तब्बल ३४० वृक्षांभोवतीचे काँक्रिट काढण्यात आले

समुद्रात जाणारा कचरा रोखण्यासाठी आवश्यक त्याठिकाणी ‘ट्रॅश बूम’

मुंबई : ट्रॅश बूममुळे नदी, नाले आणि समुद्रात तरंगणारा कचरा अडवला जातो. प्रामुख्याने नाल्यांच्या तोंडावर लावल्या