मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या (Mahesh Manjrekar) वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच त्यांचा ‘नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा’ (Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. परंतू या चित्रपटातीत दाखण्यात आलेल्या दृष्यांमुळे महिला आयोगाने या चित्रपटाविरोधात तक्रार नोंदवली. त्यामुळे आता या चित्रपटाचा ट्रेलर सर्व प्लॅटफोर्मवरून हटवण्यात आला आहे.
वरन भात लोन्चा, कोण नाय कोन्चा या महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमात महिला आणि लहान मुलांबद्दल आक्षेपार्ह दृष्ये आणि भाषा वापरण्यात आल्याच्या तक्रारी पालकांकडून महिला आयोगाला प्राप्त झाल्यात. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना पत्र लिहून याबाबत लेखी खुलासा करण्यास सांगितलय. वरन भात लोन्चा कोण नाय कोन्चा या सिनेमाच्या प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमधे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली महिला आणि लहान मुलांची अवहेलना करण्यात आल्याच रुपाली चाकणकर यांनी म्हटलय. या चित्रपटाच प्रदर्शन रोखण्याची मागणी होत असल्याच रुपाली चाकणकर यांनी या पत्रात नमूद केलय. याबाबत रूपाली चाकणकर यांनी ट्वीट देखील केले आहे.
महेश मांजरेकर यांच्या 'नाय वरण भात लोन्चा कोण नाय कोन्चा' या चित्रपटाचे प्रकाशित करण्यात आलेल्या ट्रेलर बाबतीत विविध स्तरावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यामध्ये महिला आणि अल्पवयीन मुलाचे जे दृश्य आहे त्याबाबत ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या अनेक पालकांनी आक्षेप नोंदवला 1/2 pic.twitter.com/RqZEfKvAAM
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 13, 2022