Tuesday, May 6, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

फुटपाथवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई

फुटपाथवरील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई
भाईंदर (वार्ताहर) :- मीरा भाईंदर शहरात रस्त्यावर वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील लोकांना सुरक्षित रित्या चालता येत नाही त्याकरता पालिकेने ठिकठिकाणी फुटपाथ बनवले आहेत. मात्र शहरातील लोकांचे दुर्दैव इतके खराब आहे की अनधिकृत फेरीवाले, भाजीवाले, वाहन विक्रेते, गॅरेज चालक यांनी फुटपाथवर कब्जा करून लोकांना चालण्याकरता फुटपाथच ठेवले नाहीत, यामुळे लोकांना आपला जीव मुठीत घेऊन रसत्यावरून वाहनांचा सामना करत जावे लागत आहे व यामुळे अनेकदा अपघात होऊन काहीजण जख्मी देखील झाले आहेत तर काहीना जीव गमवावा लागला आहे. मात्र लोकांना होणाऱ्या त्रासाची दखल आता प्रभाग क्रमांक ४ च्या सभापती डॉ. प्रीती पाटील यांनी घेण्यास सुरवात केली आहे.

सभापती डॉ. प्रीती पाटील यांनी मीरा भाईंदर महानगर पालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ च्या प्रभाग अधिकारी कांचन गायकवाड़,अतिक्रमण विभाग प्रमुख,स्थानिक पोलिस स्टेशन, वाहतूक शाखा या सर्वाना पत्र व्यवहार करूण आज होणाऱ्या कारवाईला पालिकेच्या फ़ौजफाट्या सहित उपस्तित राहण्यास सांगण्यात आले होते. गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास सभापती डॉ.प्रीती पाटील यांनी पालिका अधिकारी,कर्मचारी, स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिस यांच्या सोबत गोल्डन नेस्ट चौक ते काशिमिरा पर्यंत फुटपाथ वरुण चालत जाऊन रसत्यात फुटपाथ वरुण चालण्यास अडथळा निर्माण करणाऱ्या सर्व अनधिकृत गोष्टिवर जागेवर कारवाई करण्यास सुरवात करण्यात आली आहे.
Comments
Add Comment