Thursday, October 10, 2024
Homeक्रीडाज्यो रूट आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक

ज्यो रूट आयपीएलमध्ये खेळण्यास उत्सुक

मेगा लिलावामध्ये उतरण्याचे संकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): चार वर्षांपूर्वी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लिलावात संधी न मिळालेला इंग्लंडचा कसोटी कर्णधार ज्यो रूट हा पुढील हंगामामध्ये खेळण्यास उत्सुक आहे. २०२२ हंगामाच्या लिलावात सहभागी होण्याचे संकेत त्याने दिले आहे.

कसोटी कारकिर्दीवर परिणाम होणार नसेल, तर या लीगमध्ये खेळायला आवडेल, असे ३१ वर्षीय रूटने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले आहे. वेळ कमी आहे पण माझ्याकडे विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. माझ्या कसोटी क्रिकेट खेळण्यावर याचा नकारात्मक परिणाम होईल का? जर मला तसे वाटत नसेल, तर मी स्वतःला लिलावात उतरवेन. पण इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळणे कठीण होईल, असे मी कधीही करणार नाही. याची खात्री करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण ती माझी आणि इतर खेळाडूंची प्राथमिकता असेल, असे रूटने म्हटले आहे. रूट हा आजच्या युगातील एक महान फलंदाज मानला जातो. मात्र, २०१८ मधील आयपीएल लिलावात कोणत्याही संघाने रूटसाठी बोली लावली नाही. रूटने गेल्या वर्षी कसोटीत सर्वाधिक १७०८ धावा केल्या होत्या. त्याने ६ शतकेही झळकावली.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कही आयपीएलमध्ये परतण्याचा विचार करत आहे. स्टार्कने शेवटची आयपीएल स्पर्धा २०१५ मध्ये खेळली होती. स्टार्कला २०१८ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सने ९.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. पण केकेआरला त्याला सोडावे लागले. आगामी आयपीएलच्या पुढील हंगामाचा मेगा लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -