Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाभारत-पाकिस्तान आमनेसामने?

भारत-पाकिस्तान आमनेसामने?

रमीझ राजांचा ‘मास्टरप्लॅन’;चार देशांची आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सीरिज खेळवण्याचा प्रस्ताव

कराची : भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी आमनेसामने येण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी ‘मास्टरप्लॅन’ आखला आहे. दरवर्षी चार देशांची आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सीरिज खेळवण्याचा त्यांचा विचार आहे. ही स्पर्धा भारतासह पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात व्हावी, असे त्यांना वाटते. तसा प्रस्तावआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) मांडणार असल्याचे राजा यांनी सांगितले.

नमस्कार मित्रांनो! भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या चार देशांच्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सुपर सीरिजचा मी प्रस्ताव देईन. ही मालिका चार देशांद्वारे रोटेशनच्या आधारावर आयोजित केली जाईल, त्याचे महसूल मॉडेल वेगळे असेल, ज्यामध्ये सर्व सहभागी देश आयसीसीसोबत नफा शेअर करतील, असे ट्विट रमीझ राजा यांनी केले आहे.

भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडतात, तेव्हा मैदानावरील रोमांच शिगेला असतो. जगभरातील चाहतेही या क्षणाची वाट पाहत आहेत. आयसीसी टी-ट्वेन्टी विश्वचषक २०२१ मध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. त्यात प्रथमच भारताला हरवण्याची करामत पाकिस्तानने साधली. याआधी कोणत्याही विश्वचषकात पाकिस्तानला भारताला हरवता आले नव्हते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -