Thursday, July 10, 2025

आंबापीक शेती शाळा कार्यक्रम उत्साहात

आंबापीक शेती शाळा कार्यक्रम उत्साहात

पोलादपूर (वार्ताहर) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्या वतीने आत्मा योजनेअंतर्गत आंबा पीक शेतीशाळा कार्यक्रम सोबत कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेती विषयक विविध उपकरणाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून पोलादपूर तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी महाडीबीटी पोर्टल वर शेतकऱ्यांनी ऑॅनलाइन अर्ज करून अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.



या शेतीशाळेच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील, मंडळ कृषी अधिकारी श्रीरंग मोरे, कृषी सहाय्यक मनोज जाधव, अनिल डासाळकर, सरपंच नितीन मोरे, नामदेव येरुणकर, शेखर येरूणकर, ज्ञानेश्वर मोरे, प्रकाश दळवी,बाळकृष्ण मोरे, सागर मोरे, प्रवीण महाडिक, राजेंद्र दळवी, सुरेशराव मोरे आदी उपस्थित होते



तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांनी उपस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शनावेळी मजुरांच्या टंचाईवर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शेती करणे काळाची गरज असल्याचे सांगत महाडीबीटी पोर्टल वर जास्तीत जास्त अर्ज ऑॅनलाईन करून शासनाच्या शेती विषयक अवजारे ५० टक्के अनुदानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे यांनी आंबा लागवड छाटणी आंबा मोहर संरक्षण या बाबत मार्गदर्शन केले.

Comments
Add Comment