पुणे : कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने माय लॅबने विकसित केलेल्या ‘सेल्फ अँटिजेन कोविड किट’ची मागणी वेगाने वाढली आहे. कोरोना लक्षणे असलेल्या आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांकडून याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याची माहिती औषध विक्रेत्यांकडून मिळाली.
‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे ड्रगिस्ट’चे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘हे किट वापरण्यास सोपे आहे. तसेच त्याचा निष्कर्ष विश्वासार्ह असल्याने याला नागरिकांनी पसंती दिली आहे. यातून कोरोना झाल्याचे निदान झाल्यास त्यावर उपचारासाठी डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच, औषधोपचारादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे गृह विलगीकरणात राहाणे आवश्यक आहे.’’