Monday, July 22, 2024
Homeदेशदाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी

दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात आणण्याचे प्रयत्न अयशस्वी

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकरला भारतात परत आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सोहेल कासकरला अमेरिकन एजन्सीने नार्को टेररिझम प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर मुंबई पोलीस त्याला भारतात आणण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सोहेल कासकर हा आता पाकिस्तानात परतला आहे. अमेरिकन एजन्सीने सोहेल बरोबर अटक केलेल्या दानिश अलीला भारतात आणण्यात यश आले होते. त्यानंतर मुंबई पोलीस सोहेलला भारतात आणण्याची तयारी करत होते. मात्र, भारतीय पोलिसांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सोहेल हा दाऊद इब्राहिमचा भाऊ नूरा कासकरचा मुलगा आहे. नूराचा 2010 मध्ये पाकिस्तानमध्ये मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे मृत्यू झाला होता.

अलीकडेच मुंबई पोलिसांना सोहेल कासकर हा दुबईमार्गे पाकिस्तानात परतल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी अमेरिकन एजन्सीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, मुंबई पोलीस आणि अमेरिकन एजन्सी यांच्यात समन्वयाच्या अभावावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच अमेरिकेच्या एजन्सीने सोहेल कासकरला भारताकडे न सोपवता त्याला सोडून का दिले असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -