Tuesday, April 29, 2025

मनोरंजनताज्या घडामोडी

अर्जुन कपूर व मलायका अरोरा या हॉट अँड क्युट कपलचा ब्रेकअप?

अर्जुन कपूर व मलायका अरोरा या हॉट अँड क्युट कपलचा ब्रेकअप?

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि त्याची हॉट गर्लफ्रेंड अर्थात अभिनेत्री मलायका अरोरा या जोडीचे सोशल मीडियावर सुद्धा लाखो चाहते आहेत. मलायका सध्या चित्रपटसृष्टीत सक्रिय नसली तरी अनेक ठिकाणी मलायका आपल्या बॉयफ्रेंड म्हणजेच अर्जुन कपूर सोबत दिसून येते. डिनर असो वा कॉफी डेट सर्वच ठिकाणी मलायका आणि अर्जुन सोबत असायचे. फॅन्स सुध्या त्यांच्या जोडीला भरभरून प्रेम देतात. मात्र, आता बॉलिवूडच्या या हॉट अँड क्युट कपलचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अर्जुनने मलायकाशी सर्व संबंध तोडून टाकले आहेत.

मलायका अरोरा गेल्या सहा दिवसांपासून घराबाहेर पडलेली नाही. ब्रेकअपचा धक्का तिला सहन झालेला नसल्याने तिला एकटे राहायचे आहे आणि घराबाहेर पडण्याच्या मन:स्थितीत ती नसल्याचे सांगितले जात आहे.

अर्जुन कपूर रिया कपूरच्या घरी डिनरसाठी गेला होता. रियाचे घर मलायकाच्या घराच्या अगदी जवळ असूनही अर्जुन कपूर तिथे गेला नाही. लवकरच हे दोघे विवाह बंधनात अडकणार होते. परंतु त्या शक्यता आता मावळल्या आहेत.

दरम्यान, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अर्जुन-मलायका मालदीव मध्ये फिरायला गेले होते. मालदीव मध्ये सुद्धा या जोडीने तुफान मजा-मस्ती केल्याचे दिसून आले. आपल्या मालदीव ट्रिपचे अनेक फोटो आणि व्हिडिओ अर्जुन-मलायकाने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र त्यानंतर त्यांच्यात कशामुळे दुरावा निर्माण झाला याचे कारण त्यांचे चाहते शोधत आहेत.

Comments
Add Comment