जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतर भाजप पदाधिकाऱ्यांचा जल्लोष

वैभववाडी (प्रतिनिधी) :जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड जाहीर होताच वैभववाडी भाजपच्या वतीने फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. जिल्हा बँक अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी धक्कातंत्र वापरत बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांच्या नावाची घोषणा केली.

निवड जाहीर होताच वैभववाडी तालुका भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला. नारायण राणे आगे बढो..., नितेश राणे आगे बढो... अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष नासीर काझी, माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, वैभववाडी भाजप किसान मोर्चा अध्यक्ष महेश संसारे, संजय सावंत, कोकिसरे सरपंच दत्ताराम सावंत, सुनील भोगले, किशोर दळवी, प्रकाश पाटील, आबा गुरव, बाळा वाडेकर, बंधू वळंजू, प्रदीप जैतापकर, संताजी रावराणे, उदय पांचाळ, रमेश शेळके, प्रमोद सावंत व कार्यकर्ते उपस्थित होते.
*(फोटो 13-बीजेपी बँक)- वैभववाडीत जल्लोष करताना भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते.
Comments
Add Comment

Govind Barge case: सोन्याचे दागिने, प्लॉट, बुलेट ते शेतजमीन... तरी तिची भूक भागली नाही, गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट!

बीड: गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची

पीएमपीएमएलची पानशेत पर्यटन बससेवा

जंगल सफारीचे विशेष आकर्षण पुणे : पीएमपीएमएलने पुणेकरांच्या आग्रहास्तव पानशेत पर्यटन बससेवा सुरू केली आहे. ही

‘महादेवी’च्या अनुपस्थितीतच नांदणी मठात नवरात्रोत्सव साजरा होणार ?

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायालयाने महादेवी हत्तीण नांदणी मठाकडे पाठविण्यासंदर्भात उच्चस्तरीय

हिंदी कवी कुमार अंबुज यांना यंदाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

नाशिक (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिल्या जाणाऱ्या कुसुमाग्रज राष्ट्रीय

MSRTC ST jobs recruitment : राज्यातील युवांसाठी सुवर्णसंधी! एसटीमध्ये मेगाभरती धमाका, १७,४५० चालक-सहायक पदे तर तब्बल 'इतका' पगार

मुंबई : भविष्यात राज्यातील सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत सुमारे ८,००० नवीन बसेस सुरू करण्याच्या योजना असल्याने

Navratri 2025 : नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूंसाठीचं, मुस्लिमांना 'नो एंट्री' ,विश्व हिंदू परिषदेची कठोर सूचना

नागपुर : देशभरात उत्साहाने सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातून एक मोठी अपडेट समोर