Tuesday, April 22, 2025
Homeताज्या घडामोडीकोरोना अहवालाच्या प्रतीक्षेमुळे संसर्ग पसरण्याचा धोका

कोरोना अहवालाच्या प्रतीक्षेमुळे संसर्ग पसरण्याचा धोका

मात्र, पीटरसन नडला

नाशिक :कोरोना संसर्गाच्या निदानासाठी चाचण्या करण्यासाठी संभाव्य रुग्णांच्या स्वॅब संकलन केंद्रांवर रांगा लागत असतानाच त्यानंतर अहवाल प्राप्त होण्यास विलंब होत असल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागत आहे. विशेषत: शहरातील संभाव्य रुग्णांना अहवाल प्राप्तीसाठी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागत असल्याच्या तक्रारी असून अशा व्यक्तींमुळे कोरोना संसर्ग आणखी पसरण्याचा धोकादेखील वाढतो आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या तीन दिवसांपासून एक हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामध्ये शहरातील रुग्णसंख्येचे प्रमाण ८० टक्क्यांच्या जवळपास आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना निदान चाचण्या करण्याचे धोरण आरोग्य यंत्रणांनी सुरुवातीपासून अवलंबले आहे. त्यामुळे संबंधित रुग्ण चाचण्यांसाठी खासगी व सरकारी लॅबकडे धाव घेत आहेत. बदलत्या वातावरणामुळे शहरात सर्दी, खोकला, तापाचे रुग्णदेखील वाढले असून, असे रुग्णही कोरोना संसर्गाच्या धास्तीने आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शहरातील खासगी, सरकारी लॅबमध्ये स्वॅब देण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागत आहेत. संबंधितांचा अहवाल २४ तासांत येणे अपेक्षित असले तरी महापालिकेच्या संकलन केंद्रांवर स्वॅब देणाऱ्या संभाव्य रुग्णांना दोन दिवस अहवाल मिळत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. राज्याबाहेर प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांनाही कोरोना निदान चाचणीचा अहवाल जवळ बाळगणे अनिवार्य असून, त्यांनाही वेळेत अहवाल मिळत नसल्याने नागरिकांचा जीव टांगणीला लागत आहे.

सरकारी रुग्णालयांत रोज दोन हजार चाचण्या

येथील सिव्हिल हॉस्पिटलमधील लॅबमध्ये दररोज दोन हजारांहून अधिक स्वॅबची तपासणी होत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. ग्रामीण भागांतील संभाव्य रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलच्या लॅबमध्ये येतात. त्याशिवाय आरोग्याच्या तक्रारी घेऊन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या शहरातील संभाव्य रुग्णांचे स्वॅब घेऊन त्यांचीही तपासणी करण्यात येते. परंतु, या सर्वांचे अहवाल २४ तासांत दिले जात असल्याची माहिती जिल्ह्यातील प्रयोगशाळांचे संनियंत्रक डॉ. उत्कर्ष दुधेडिया यांनी दिली. तथापि स्वॅबचा अहवाल मेसेज रुपात मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे रुग्ण अहवालापासून अनभिज्ञ राहतात. अहवाल घेण्यासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्येच यावे लागते. अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे त्यांच्या केसपेपरवर लिहून दिले जाते. त्यामुळे स्वॅब संकलनावेळी मेसेज प्राप्त होतो तसा अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह याचा मेसेजही संबंधित रुग्णाला प्राप्त होणे आवश्यक आहे. यासाठी नवीन अपडेटेड सॉफ्टवेअरची आवश्यकता असून, त्यासाठीचा प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती डॉ. थोरात आणि डॉ. दुधेडिया यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -