दिल्ली : राज्यातील व देशातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होताना दिसत आहे आणि या यादीमध्ये आणखी एका बड्या नेत्याचे नाव आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना सौम्य लक्षणं आहेत.
सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत:ला सर्व अटींची पूर्तता करत होम क्वॉरंटाईन केले आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी तपासणी करावी, असे आवाहन गडकरी यांनी केले आहे.