Sunday, October 26, 2025
Happy Diwali

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा वाढला

मुंबईत कोरोना रुग्णसंख्येचा आकडा पुन्हा वाढला
मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्यात सातत्याने चढ उतार पाहायला मिळतोय. कालची कोरोनारुग्णांची आकडेवारी ही घसरली होती पण आज पुन्हा रुग्णसंख्येत वाढ दिसून आली आहे.  मागील 24 तासांत 16 हजार 420 नवे कोरोनाबाधित सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारच्या तुलनेत जवळपास 5 हजार अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. या कोरोनारुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली असून नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन पालिकेने केलं आहे.
Comments
Add Comment