नालासोपारा: वसई-विरार पालिकेचा मुख्य वैद्यकीय अधिकारी सुनील वाडकर बोगस डॉक्टर असल्याच प्रकरण बाहेर आल्यावर आता वसईच्या पारनाका येथे पॅरेडाईज अपार्टमेंट या उच्चभ्रू वस्तीत आणखी एक बोगस डॉक्टर सापडला आहे. याबाबत वसई पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
हेमंत पाटील उर्फ सोनावणे असं बोगस डॉक्टरच नाव आहे. हेमंत पाटीलने २०१८या पॅरेडाईज इमारतीत अस्थिरोगतज्ञाचा दवाखाना सुरू केला होता. त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची डॉक्टरकीची पदवी नव्हती. तसेच त्यांने महाराष्ट्र मेडिकल काउन्सील तसेच वैदकीय अधिनियम १९६१ अन्वये पाञ वैद्यकीय प्रमाणपञ आणि रजिस्टेशन क्रमांक न घेताच हा अस्थिरोगतज्ञाच दवाखान चालवत होता. बोगस डॉक्टर बनून तो लोकांची दिशाभूल आणि फसवणूक करत होता. याबाबतची माहिती पालिकेच्या वैद्यकिय विभागाला लागल्यावर पालिकेच्या वैद्यकिय अधिकाऱ्याने वसई पोलीस ठाण्यात हेमंत पाटीलवर गुन्हा दाखल केला.
पोलिसांना ही त्याची कागदपञे बोगस असल्याच निष्पन्न झालं आणि पोलिसांनी ही त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हेमंत पाटील हा वसईत २०१८ पासून अस्थिरोगाचा दवाखाना चालवत होता. यावेळी त्याने अनेक रुग्णावर उपचार देखील केले होते. अस्थिरोगतज्ञ म्हणून त्यांने शस्ञक्रिया ही केल्या. अनेकांवर त्याने चुकीचे उपचार केल्याचे देखील पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आठ जणांनी हेमंत पाटील विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार ही नोंदवली आहे. त्याचा तपास पोलीस करत आहेत. हेमंत पाटील विरोधात अमरावतीच्या राजपेठ पोलीस ठाण्यात त्याची पत्नी डॉ. पूनम सोनावणे हीने ही फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या तपासात अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. दहावीनंतर अवघ्या तीन वर्षातच त्याने एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. डॉक्टर झाल्यानंतरही तो एका एजन्सीत मसाला विक्री, तसेच एका कंपनीत सेल्समनचे काम करत असल्याच उघड झालं आहे.