Monday, May 5, 2025

महाराष्ट्रमहत्वाची बातमी

रत्नागिरी जिल्हा थंडीने कुडकुडला

रत्नागिरी जिल्हा थंडीने कुडकुडला
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच भागात गोठवणारी थंडी पडल्याने ग्रामीण भागातील जनतेसह शहरी भागातही स्वेटरचा वापर वाढला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे थंडीचा मोसम वाढला असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीत तर पारा ९.७ अंशावर आला होता. रत्नागिरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पारा कमालीचा खाली आल्याने हुडहुडी भरणारी थंडी दिवसा जाणवत आहे. सूर्य डोक्यावर आला तरी थंडीचा कहर मात्र कमी होत नाही. त्याचा परिणाम सर्वांवरच होताना दिसून येत आहे. मात्र, पडलेल्या थंडीमुळे आंबा बागायतदारांसह काजू बागायतदारही खूश झाले आहेत. यावर्षी आंब्याचे चांगले पीक येईल, असा अंदाज आंबा शेतकऱ्यांकडून वर्तविला जात आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आजारपणामध्ये वाढ होण्याची शक्यता विविध डॉक्टरांकडून वर्तविली जात आहे.
Comments
Add Comment