Saturday, October 18, 2025
Happy Diwali

दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात बंधनकारक

दुकानांच्या पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात बंधनकारक
मुंबई : राज्यातील सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी व्हायची नाही, मात्र  आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत मोठ्या अक्षरात कराव्या लागणार आहेत. राज्य सरकारने आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून हा निर्णय बंधनकारक केला आहे त्यामुळे दुकानदारांना आता कसलीही पळवाट शोधता येणार नाही. आता इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली. दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत 'महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम 2017' हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणीही होत होती. आज मंत्रीमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्थीचे विनयमन) अधिनियम, 2017 यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला.
Comments
Add Comment