मुंबई : मधुर भांडारकर यांचा इंडिया लॉकडाऊन हा चित्रपट येत्या मार्च किंवा एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र राज्यातल्या वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा थेट परिणाम हा मनोरंजन क्षेत्रावरही होताना दिसतोय. त्यामुळे इंडिया लॉकडाऊन हा सिनेमा कधी प्रदर्शित करावा याबद्दल मधुर भांडारकर अत्यंत गांभीर्याने विचार करत आहेत.
मधुर भांडारकर यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार, “दिल्लीतील सर्व चित्रपटगृहे अचानक बंद झाली आहेत. जर्सी आणि इतर अनेक चित्रपट हे प्रदर्शित होण्याच्या रांगेत होते. मात्र या परिस्थितीमुळे त्यांना आता पुन्हा एकदा धक्का बसला आहे. यानंतर आता आपण काय करावे? असा प्रश्न पडला आहे.”
मधुरच्या या मुलाखतीनुसार सध्या तरी त्यांच्या सिनेमांच्या चाहत्यांना त्यांचा आगामी सिनेमा पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षाच करावी लागेल असंच वाटतंय.
या आधी मधुर भांडारकर यांनी चांदनी बार, ‘पेज थ्री’, ‘फॅशन’, ‘जेल’, ‘हिरॉइन’ यासारखे दर्जेदार फिल्मस केले.