Sunday, October 26, 2025
Happy Diwali

कर्मचा-यांच्या सातव्या वेतन आयोगासाठी महापालिका चार कोटी देणार

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (पीएमपीएमएल) कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे महापालिका सहा कोटी व पिंपरी-चिंचवड महापालिका चार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य देणार आहे. यासाठी दोन्ही महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षांनी सहमती दिली असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या संचालक मंडळाची बैठक स्वारगेट येथील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, यांचे कार्यालयात पार पडली. अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजने अंतर्गत परिवहन महामंडळाकडील सेवकांची प्रतिपूर्तीची व हॉस्पिटल देयके तपासणी कामी आरोग्य विभागाकडील वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात येत असलेली मुशाहिराची रक्कम रुपये 1 हजाराऐवजी 2 हजाराप्रमाणे अदा करण्यास मान्यता देण्यात आली.
Comments
Add Comment