Friday, June 13, 2025

कोकण रेल्वे चिपळूण येथे खोळंबली

कोकण रेल्वे चिपळूण येथे खोळंबली

चिपळूण (वार्ताहर): कोकण रेल्वे मार्गावर जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने चिपळूण येथे ती खोळंबली होती. मात्र अर्ध्या तासात बिघाड दुरुस्त झाल्यानंतर गाडी मार्गस्थ करण्यात आली, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. चिपळूण येथे जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने गाडीला बिलंब झाला.


दादर- मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेनुसार चालली होती. मात्र, चिपळूण नजिकच्या कापसाळ दरम्यानच्या बोगद्याजवळ गाडीच्या इंजिनात बिघाड झाला. त्यामुळे दुरूस्तीच्या कामात अडथळा निर्माण झाला. दुसरे इंजिन येईपर्यंत गाडीला विलंब झाला होता. दुरूस्तीनंतर गाडी अर्ध्या तासात मार्गस्थ झाली.

Comments
Add Comment