भाईंदर : सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला सलाम म्हणून मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात येत्या काळात बनविण्यात येणाऱ्या वास्तूंपैकी एका वास्तूचे नामकरण त्यांच्या नावाने व्हावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मिरा-भाईंदर शहर अध्यक्ष हेमंत सावंत यांनी पालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे केली आहे.
ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई यांच्या निधनानंतर मीरा भाईंदर शहरात मंगळवारी सायंकाळी ऑरेंज हॉस्पिटल, मिरारोड (पूर्व) येथे त्यांच्या फोटोला हार लावून,मेणबत्या पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्या ठिकाणी कार्यक्रम झाला. त्याच ठिकाणी माईचा आशीर्वाद व त्यांची सावली सदैव आपल्या सोबत राहावी म्हणून झाडे लावण्यात आली मात्र पालिकेच्या एखाद्या वास्तुला त्यांचे नाव दिले तर कायम त्यांचे नाव लोकांच्या मनात कायम राहील, अशी मनसेची मागणीआहे.