लखनऊ : विधानसभा निवडणुकांची घोषणा होता उत्तर प्रदेशात फोडोफोडीचे राजकारण सुरू झाले आहे. भाजपचे तीन आमदार आणि एक दोन कॅबिनेट मंत्री फुटल्यानंतर आता भाजपनेही समाजवादी पार्टी आणि काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. समाजवादी पार्टीचा विद्यामान आणि एक माजी आमदार तसंच काँग्रेसच्या एका विद्यमान आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपनेही आज तीन आमदारांना पक्षात प्रवेश दिला. सहारनपूर जिल्ह्यातील बेहाट येथील काँग्रेसचे आमदार नरेश सैनी, फिरोजाबादमधील सिरसागंज मतदारसंघातील समाजवादी पार्टीचे आमदार हरिओम यादव आणि समाजवादी पार्टीचेच माजी आमदार धरमपाल यादव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
काँग्रेस, सपाचे ३ आमदार भाजपात
