Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल

ठाणे : ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मे. जे कुमार इन्फाप्रोजेक्ट लि. या कंपनीकडून मुंबई मेट्रो लाईन-4 चे कासारवडवली ते गायमुखपर्यंत काम चालू आहे. ओवळा सिग्नल ते वेदांत हॉस्पिटल, घोडबंदर रोड, ठाणे या ठिकाणी मेट्रो 4 चे पिलरवर गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. यावेळी ठाणे कडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.

या मार्गावरील वाहतूक बदल पुढील प्रमाणे

प्रवेश बंद :- मुंबई-नाशिक महामार्गाच्या घोडबंदर रोडच्या दिशेने जाणा-या अवजड वाहनांना तत्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी जंक्शन येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने ही कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेवून बाळकुम नाका, भिवंडी आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजुर फाटा, भिवंडी मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच इतर हलकी वाहने ओवळा सिग्नल येथे डावीकडे वळण घेवून विहंग सोसायटी समोरून उजवीकडे वळण घेवून घोडबंदर रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद :- मुंबई कडून कापूरबावडी जंक्शन, तत्वज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदर रोडकडे जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना माजीवाडा गोल्डन डाईज ब्रिजवर वाय जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची जड अवजड वाहने ही नाशिक रोडने खारेगांव टोलनाका, मानकोली नाका, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.

ही वाहतूक अधिसूचना ही खालील नमूद कालावधी दरम्यान गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होई पर्यंत अमलात राहणार आहे. खालील वेळात गर्डर टाकण्याचे काम होणार आहे.

दि. 12 जानेवारी 2022 रोजी रात्री 23.00 वा. ते दि. 13 जानेवारी 2022 रोजी सकाळी 05.00 वाजे पर्यंत. दि. 14 जानेवारी 2022 रोजी रात्री 23.00 वा. ते दि. 15 जानेवारी 2022 रोजी सकाळी 05.00 वाजे पर्यंत

ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गैस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे उपायुक्त श्री. पाटील यांनी कळविले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -