मुंबई :मुंबईतील पश्चिम उपनगरातील १०५ बस थांबे बदलण्यात येणार असून जिल्हा नियोजन समितीच्या निधितून हा बदल करण्यात येणार आहे. उपनगरात अनेक बस थांब्याना बसण्याची सोय नाही. मात्र आता नवीन बस थांब्यावर बसण्याची देखील व्यवस्था असेल. त्याचबरोबर कोरोना रुग्णसंख्या वाढल्यामुळे रेल्वेप्रमाणे बेस्टने देखील लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची मुभा दिली आहे. पण यापुढे बसचालकांसाठी देखील लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे.
बेस्ट ही मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असून रोज २८ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. महापालिकेच्या नियोजन विभागाच्या माध्यमातून या बसथांब्यांचा विकास केला जाणार असून यासाठी नियोजन विभागाने निविदा मागवल्या आहेत. कमीत कमी जागा व्यापणाऱ्या या बसथांब्यासाठी पावणेनऊ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मंजुरी मिळाल्यानंतर हे काम सहा महिन्यांत पूर्ण होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या काही बस थांबे गर्दुल्ले, भिकारी यांचा अड्डा झाला आहे. मात्र आता त्यांना हटवून या थांब्यांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे.
कोरोनाचे नियम कडक
कोरोनाच्या पहिल्या लाटेत सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेप्रवास बंद असताना बेस्टने मुंबई आणि मुंबईच्या बाहेरही सेवा दिली होती. मात्र आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बेस्ट उपक्रमाकडून देखील नियम कडक करण्यात आले आहेत. काही दिवसांपासून बेस्ट उपक्रमाने बस आगारातील प्रवाशांच्या युनिवर्सल पासची तपासणी सुरू केली आहे. दोन डोस घेतलेल्या प्रवाशांनाच केवळ बेस्टने बसने प्रवास करता येणार आहे. मात्र आता प्रवाशांसोबत चालकही लसीचे दोन डोस घेतलेला असला पाहिजे. ज्या बस चालकाचे लसीचे दोन डोस घेतलेले नाहीत, अशा चालकाला बस चालवण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ बसचालकच नव्हे, तर वाहक, तिकीट तपासनीस व इतर कर्मचारी अशा सर्वांनीच दोन डोस घेणे बेस्ट प्रशासनाने बंधनकारक केले आहे.
या ठिकाणचे बस थांबे बदलणार
ओशिवरा – १५, गोवंडी – १३, देवनार – ११ तर गोरेगाव – १० सर्वाधिक बसथांबे बदलण्यात येणार आहे. तर अन्य ठिकाणांमध्ये कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, सांताक्रुझ,